आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझी वसुंधरा अभियान अंतर्गत मंद्रूप ग्रामपंचायतीस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे एक कोटी रुपयांचे तर महापालिकेस पुणे विभागात चौथ्या क्रमांकाचे दोन कोटींचा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार सोहळा पाच जून राेजी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पाच महिन्यांनी सत्तांतर झाल्यानंतर आताच्या सरकारने बक्षिसांची रक्कम जाहीर केली. पुरस्कारांची उसनवारी पाच महिन्यांनी देण्यात आली.
माझी वसुंधरा अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात आले. त्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, ग्राममंचायत यांचा समावेश आहे. मंद्रूप ग्रामपंचायतीस राज्यातील दुसऱ्या क्रमांकांचे पुरस्कार देऊन पाच जून रोजी सन्मानित करण्यात आले. सरपंच कलावती खंदारे, ग्रामसेवक नागेश जोडमाेटे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. तर सोलापूर महापालिकेने पुणे विभागात चौथा क्रमांक पटकावला. त्याचे पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी रक्कम जाहीर केली नव्हते. सहा महिन्यांनी सरकार बदलानंतर शासनाने अध्यादेश काढून रक्कम जाहीर केली. पाच महिन्यांपूर्वी मिळालेली पुरस्कारांची रक्कम उसनवारीसारखी मिळाली. मंद्रूपमध्ये वृक्षलागवड झाल्याने त्यांना पुरस्कार देण्यात आला. शहरात केगाव येथील ४८ एकर क्षेत्रावर लोकसहभागातून स्थानिक प्रजातींची झाडे लावली, निर्माल्यापासून खतनिर्मिती, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन आदी अभिनव संकल्पना राबविण्यात आल्याने पुरस्कार देण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.