आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांची माहिती:आसरा पूल आराखड्यासाठी महापालिकेने 18 लाख भरले; रुंदीकरणाच्या कामाला गती येणार

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुळे सोलापुरातील नागरिकांसाठी आवश्यक असलेले आसरा पुलांच्या रुंदीकरणाच्या आराखडा तयार करण्यासाठी १८ लाख रुपये महापालिकेने रेल्वे विभागाकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीने कामास गती दिली जाणार आहे. पालिका जन्म-मृत्यू विभागाच्या दाखले ऑनलाइन पध्दतीने मिळत असून, त्यासाठी नागरिकांना माहिती मिळावे म्हणून पालिका कॉल सेंटर सुरु करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

आसरा पुलांचे रुंदीकरण केल्यास तेथे होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीने काम करण्यात येणार आहे. महापालिकेने आराखडा करण्यासाठी १८ लाख रुपये भरले. मिळकतीचे नूतनीकरण महापालिका करत असून, नागरिकांनी वाढीव बांधकामाची माहिती बांधकाम पूर्ण झाल्यावर १५ दिवसांच्या आत पालिकेस द्यावे. अन्यथा महापालिका अशा मिळकतीचे शोध घेऊन घराचे माप घेऊन कर आकारणी करेल. याबाबत नागरिकांना जाहीर प्रसिध्दीकरणाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

कॅरिबॅगबाबत कारवाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांना टार्गेट देण्यात येणार आहे. तसेच बचत गटाच्या महिलांना पिशवी तयार करून व्यापाऱ्यांना देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

अनुकंपा तत्त्वावर भरती प्रकरणी विभागीय चौकशी
महापालिकेतील अनुकंपा तत्वावर पालिका सेवेत घेतल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची विभागीय चौकशी करावी म्हणून शासनाकडे शिफारस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर केली आहे. त्यावर शासन निर्णय झाला नाही.

जन्म-मृत्यू विभागाची माहिती देण्यासाठी कॉल सेंटर
नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले सोयीस्कर आणि जलदगतीने मिळावे म्हणून ऑनलाइन सेवा सुरु करण्यात आली. नावात बदल, नाव दाखल यासह दाखला आणि त्रुटीबाबत माहिती नागरिकांना मिळावी म्हणून कार्यालयीन वेळेत कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. संपर्क क्रमांक महापालिका जाहीर करेल.

बातम्या आणखी आहेत...