आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जलपर्णी लेवून महापालिकेचा निषेध; अतिरिक्त आयुक्तांना जलपर्णीचे गुच्छ

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावातील जलपर्णी काढण्यात आली होती. पुन्हा जलपर्णी वाढल्याने नौकायनात अडचण येत आहे. तलावात येणारे मैलामिश्रीत पाणी त्वरीत बंद करावे आणि जलपर्णी काढावी अशी मागणी करत तलावातील जलपर्णी परिधान करून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महापालिकेत आले होेते.

अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना जलपर्णीचे गुच्छ देत निवेदन दिले. यावेळी मागणी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, शहर संघटक दत्ता जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...