आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय योजनेची गुरूवारपर्यंत मुदत:एका दिवसांत महापालिकेची 2.16 कोटी रुपयांची वसुली

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने थकीत करदात्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी केलेल्या वसुली मोहिमेमुळे पालिकेच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख ५२ हजार ६९४ रुपये जमा झाले. दरम्यान, पालिकेने दिलेल्या अभय योजनेची मुदत गुरुवारी संपत आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले.

वसुलीपोटी आनंद वाघमारे यांचा गाळा सील करण्यात आला आहे. सुहास हुंबरवाडी यांनी २७.१८ लाख, गिरीश स्वामी ३.१७ लाख रुपये, विनायक रार्चला १९.३९ लाख रुपये यांच्यासह १३ जणांकडून ८७ लाख ३ हजार रुपये वसुल करण्यात आले तर दैनंदिन वसुलीत १.२९ कोटी रुपये असे एकूण २.१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...