आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन मान्यता:महापालिका सुरू करणार 12 नवीन आरोग्य केंद्रे; हद्दवाढला दिलासा, 4 ठिकाणी नव्याने ओपीडी

सोलापूर15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

शहरात १२ नागरी आरोग्य केंद्रे असून, वाढते शहरीकरण पाहता नव्याने १२ दवाखाने सुरू करण्यास आरोग्य विभागाचे उपसंचालकांनी मान्यता दिली आहे. पुणे विभागात १४५ दवाखाने सुरू करण्यास मान्यता असून, त्यात सोलापूर शहरातील १२ दवाखान्यांचा समावेश आहे. याबाबत २५ एप्रिल रोजी आदेश काढण्यात आला आहे. १२ दवाखान्यांपैकी ८ ठिकाणची जागा निश्चित असून, चार ठिकाणी नव्याने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.

शहरात नव्याने दवाखाना सुरू करावेत. विशेषत: हद्दवाढ भागात मागणी होती. याबाबत महापालिकेने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स असणार आहेत. नागरिकांची तपासणी करून प्राथमिक उपचार तेथे करण्यात येणार आहेत.

शहरात या ठिकाणी सुरू होतील दवाखाने

 • पनाश अपार्टमेंट, विजापूर रोड
 • शानदार चौक शास्त्रीनगर,
 • सहारा दवाखाना काळी मशीद-शिवाजी चौक,
 • निराळे वस्तीजवळ उंब्रजकर वस्ती,
 • हुडको सुदर्शननगर विजापूर रोड.
 • आयुर्वेद दवाखाना २५६ गाळा, मड्डी वस्ती.
 • अग्निशमन केंद्राजवळ साखर पेठ,
 • मंगळवार पेठ तुळजापूर वेस,
 • रेल्वे स्टेशनसमोर सिकची दवाखाना,
 • रामवाडी थोबडे वस्ती नीलम नगर.
बातम्या आणखी आहेत...