आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नगरपरिषद प्रारूप मतदार यादी येत्या मंगळवारी जाहीर होणार; काम टप्प्यात

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नगरपरिषदांचा आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाला असून मंगळवारी सर्व नगरपरिषदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागवण्यात येणार आहेत, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त एन. के. पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, “प्रारूप मतदार यादीवरील सूचनांचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून अभिप्राय देण्यात येईल. त्यानंतर १ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलैला मतदार केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. नगरपरिषदांची अंतिम प्रभाग रचना ९ जूनला प्रसिद्ध झाली. मंगळवेढा, कुर्डुवाडी, बार्शी, मोहोळ मधील काही प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, दुधनी नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देऊन निवडणूक आयोग तसेच विभागीय आयुक्तांकडून जाहीर झाले आहे.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील दहा आणि नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगर परिषदांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेतली. नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शंभरकर यांनी त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवलेला होता. विभागीय आयुक्तांनी तसेच निवडणूक आयोगाने नगरपरिषदांचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आला असून त्यानंतर आता मतदान केंद्रानिहाय प्रारूप मतदार यादी अंतीम करण्याचे काम सुरू आहे.

विभागीय आयुक्तांकडून २९ जूनला अंतिम मंजुरी
१० जूनला आरक्षण सोडतीची नोटीस प्रसिद्ध झाली असून १३ जूनला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. बुधवारी १५ जूनला हरकती व सूचना मागवण्यासाठी नोटीस जाहीर झाली. १५ ते २१ जूनपर्यंत नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना मांडता येईल. २४ जूनला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांकडे हरकती पाठवणार आहेत. २९ जूनला विभागीय आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...