आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी गुरुवारी प्रसिध्द करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका निवडणुक कार्यालयाने तयारी पुर्ण केली आहे. शहरात 9.51 लाख लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार धरण्यात आले असून, मतदार मात्र 8.09 लाख इतके आहे. त्यात 4.11 लाख पुरुष, 3.98लाख महिला तर 86 तृतीय पंथी मतदार आहेत. 31 मे पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्या मतदार महापालिका निवडणुकीसाठी पात्र असणार आहेत. प्रारुप यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यावर सूचना व हरकती मतदार घेऊ शकतील. अंतिम मतदार यादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
मतदार यादी प्रसिध्दीबाबत सूचना महानगरपालिका मुख्य कार्यालयाचे सूचना फलक, विभागीय कार्यालय क्र.1 ते 8 येथील सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. याशिवाय महापालिका निवडणुक शाखेत असेल. महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
प्रारुप मतदार याद्या विक्री
प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या निवडणूक मुख्य कार्यालय, डॉ.कोटणीस हॉल, आय.सी.आय.सी.आय. बँकेच्यावर या ठिकाणी नागरिकांना विक्री करिता उपलब्ध करण्यात आलेले आहेत. मतदार यादी प्रती पानास 1 रुपये याप्रमाणे व प्रत्येक प्रभागाचे मतदार यादीची सी.डी. 100 रुपये दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना 23 जून ते1 जुलै दरम्यान घेता येईल. त्यावर सुनावणी होऊन 9 जुलै राेजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
यावर हरकती घेऊ शकता
लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भुत झालेले असेल तर आणि प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदरांची नांवे असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नांवे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ट करणे.
अंतिम यादी 9 जुलै राेजी
अंतिम मतदार यादी प्रभाग निहाय 9 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 31 मे पर्यंत नोंद झालेले मतदार यात असतील. 8.09 लाख मतदार आहेत. पुढील कार्यक्रम प्रक्रिया निवडणुक आयोगाकडून जे सुचना येतील त्यानुसार प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.