आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाजीरवाणी व्यवस्था:महापालिकेची जीव घेणारी प्रसूतिगृहे! बाळंतिणी तीन दिवस बिनअंघोळीच्या; सातही प्रसूतिगृहांत एकाही बाळंतिणीला सॅनिटरी पॅड दिले नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याअभावी अस्वच्छ झालेली महापालिकेची प्रसूतिगृहे जीवन देण्याऐवजी जीव घेणारी झाली आहेत. आरोग्यासाठी अतिशय मूलभूत असलेले पाणीच नसल्याने बाळंतिणींचे हाल होत आहेत. दाराशा प्रसूतिगृहात पाणी नसल्याने बाळंतिणींना तीन दिवसांपासून अंघोळ करता आली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वरिष्ठ अधिकारी नियमित पाहणी करत नसल्याने दवाखान्यांत गैरसोयी वाढल्या आहेत. या दवाखान्यांत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गातील नागरिक येत असतात. त्यांची खासगीत उपचार घेण्याची ऐपत नसते.

सॅनिटरी पॅड दिलेच नाहीत
बाळंतपण झाल्यानंतर तीन दिवस महिलांना सॅनिटरी पॅडचे कॉटन दिले जाते. मात्र यातील सातही हॉस्पिटल्समध्ये एकाही महिलेला सॅनिटरी पॅड दिलेले नव्हते. कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता ‘वरूनच येत नाही, मग आम्ही कुठून देणार?’ असा उलट सवाल केला.

बातम्या आणखी आहेत...