आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या जागेत थाटली महापालिकेची कार्यालये ; अव्यवहारी दृष्टिकोन आंधळ्या कारभाराने 2 कोटींचे उत्पन्न बुडतेय

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची मालमत्ता नागरिकांच्या सोयीसाठी वापरणे आवश्यक असताना अनावश्यक कामासाठी वापरली जात आहे. महापालिका आवारात नागरिकांना आवश्यक सेवा, सुविधा देणे आवश्यक असताना कर संकलन, गवसू, स्टोअर रुम, जन्म-मृत्यू कार्यालये पालिका आवाराच्या बाहेर आहेत. यामुळे मोक्याच्या ठिकाणी उत्पन्न देणाऱ्या जागा अडगळीत पडल्या आहेत. शिवाय अशा चुकीच्या नियोजनामुळे दिव्यांग व नागरिकांची गैरसोय होतेय. तसेच व्यावसायिक विचार करता सुमारे दोन कोटींचे उत्पन्न बुडत असल्याचा अंदाज आहे.

नवी पेठ : दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक कार्यालये तळघरात असावीत रॅम्प असावा असे नियम आहे. कर संकलन, पाणीपुरवठा कार्यालये वरील मजल्यावर आहेत. जन्म- मृत्यू कार्यालय इतर ठिकाणी आहे. ते गैरसोयीचे आहे. आनंद भीमनपल्ली, दिव्यांग तर सर्व कार्यालये एकत्र पालिकेतील रेकॉर्डरुम खालीच असावी. त्यामुळे वारंवार रेकॉर्ड शोधण्यासाठी वरील मजल्यावर जाणे गैरसोयीचे होईल. पालिका आवारातील कंट्रोल अॅन्ड कमान्डची इमारत झाल्यावर सर्व कार्यालये एकत्रित येतील. पी. शिवशंकर, पालिका आयुक्त आवश्यक विभाग मनपा आवाराच्या बाहेर, नागरिकांची होतेय गैरसोय कर संकलन : हुतात्मा स्मृती मंदिर आवार महापालिकेचे कर संकलन कार्यालय हुतात्मा स्मृती मंदिर लगत असलेल्या व्यावसायिक जागेत आहेत. ती जागा हॉटेलसह अन्य नागरी सोयीसाठी दिल्यास पालिकेचे उत्पन्न वाढेल. स्मृती मंदिर येथे कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल. यापूर्वी तेथे कामत हाॅटेल होते. दिव्यांगांची गैरसोय पालिका आवारात तळमजल्यावर पूर्वी कर संकलन जागेत पालिकेने रेकॉर्ड रुम केले. रेकॉर्ड रुम पालिकेच्या चौथ्या मजल्यावर असले तरी ते सोयीचे आणि सुरक्षित राहते. तळमजल्यात नागरिक व दिव्यांगाना सोयीचे असलेले कर संकलन कार्यालय तेथून हलवल्याने गैरसोयीचे झाले. स्टोअर रुम : पनाश अपार्टमेंट विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथील जागा कराराप्रमाणे तेथील विकासकाने बांधून पालिकेच्या ताब्यात दिली. तेथे पालिकेने स्टोअर रुम केले. स्टोअर रुम पालिका आवारात असणे आवश्यक असताना पालिकेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. किरकोळ साहित्य आणण्यासाठी इंधन जळत तेथे जावे लागते. पनाश अपार्टमेंट येथील जागा शासनाच्या कंपन्याना दिल्यास पालिकेचे उत्पन्न वाढेल.

बातम्या आणखी आहेत...