आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:नगरपालिका आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर ; राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जुन्या ९ व नव्याने झालेल्या २ अशा ११ नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला व नव्याने झालेल्या अकलूज, अनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १० जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेचीही प्रभाग रचना पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता नगरपालिकेच्या सदस्यांची आरक्षण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. असा आहे कार्यक्रम : १० जून - आरक्षण सोडतीसाठी नोटीस प्रसिद्ध करणे. १५ ते २१ जून - हरकती व सूचना मागविणे. २४ जून - अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविणे. १ जुलै - सदस्य पदांच्या आरक्षणाची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करणे.

बातम्या आणखी आहेत...