आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अवैध बांधकाम शोधण्यासाठी कर संकलन विभागाने तपासणी मोहिम घेतले. त्यानुसार शोधकार्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र बेकायदेशीर बांधकामे मिळालेच नाहीत. 2.10 लाख बांधकामे असताना 1856 बेकायदा इमारती मिळाले. त्यांना पालिका कर संकलन विभागाने बेकायदा बांधकाम म्हणून दुप्पट कर आकारणी करुन बिले पाठवले. शहरातील मिळकती व सापडलेले इमारती पाहता ही संख्या सशंयास्पद असल्याचे स्पष्ट होतो. गुठेवारीत बांधकाम आलेले सर्व बांधकामे बेकायदा इमारतीत समावेश होत असताना महापालिकेने मात्र नाममात्र इमारतीना दुप्पट आकारणी केली.
इमारतींना दुप्पट आकारणी
पालिका कर संकलन विभागाने 1856 इमारती बेकायदा म्हणून दुप्पट आकारणी करुन बिले पाठवले. मागील काळात नागरिकांनी बिले भरले तरीही मागील तीन वर्षापासून दंड आकारणी करुन हजारो रुपयांचे बिल पाठवण्यात आले.
1.76 कोटी पालिकेच्या तिजोरीत
बेकायदा बांधकामाचे महापालिकेस एक कोटी 76 लाख 89 हजार रुपये रक्कम पालिकेस मिळेल. तसे बिले पाठवले आहेत.
शोधकाम शून्य
शहरातील मिळकती, त्यांना दिलेले वीज जोड, पालिकेकडील नोंदी, नळांची संख्या पाहता 1856 संख्या तुटपूंजी आहे. रुपबदलच्या नावाने नवीन इमारत बांधले. गुंठेवारीत बांधकाम परवाना मिळत नसल्याने विना परवाना बांधकाम केले असताना महापालिका शोधलेले बांधकाम शून्य अवस्थेत असल्यासारखी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.