आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Municipalities Showed Expenditure Of 90 Lakhs Out Of 1.32 Crore Provision; Smart City: Question Marks On Maintenance Cost Of Five Projects| Maathi News

देखभाल व दुरुस्ती खर्चाची तरतूद:मनपा १.३२ काेटी तरतुदीपैकी ९० लाख खर्च दाखवला; स्मार्ट सिटी पाच प्रकल्पांच्यादेखभाल खर्चावर प्रश्नचिन्ह

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रकल्पांचा देखभाल व दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पाच वर्षांचा कालावधी निश्चित करून हे काम मक्तेदाराला देण्यात आले आहे. स्मार्ट सिटीतील रंगभवन, चिल्डन पार्क, हाेम मैदान, हुतात्मा बाग, स्ट्रीट बझार या पाच प्रकल्पांच्या देखभालीबाबत कायम ओरड हाेत आहे. दरम्यान, या पाच प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १.३२ काेटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी आतापर्यंत ९० लाख खर्च झाल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रकरणी आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रश्नचिन्ह उभे केले असून यापुढे प्रकल्प ताब्यात घेताना तपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामे तपासून ताब्यात घेणार
स्मार्ट सिटीची पूर्ण केलेली कामे महापालिकेकडे हस्तांतरण केली, पण त्यासाठी देखभालीसाठी तरतूद केलेली रक्कम पालिकेकडे वर्ग करत नाहीत. इंदिरा गांधी स्टेडियमच्या बाबतीत हे घडले आहे असे सांगण्यात आले. पुढील कामे महापालिका ताब्यात घेताना तपासून घेणार आहे. त्यासाठी त्यांना एमबी रेकाॅर्ड मागितले आहे. पाइपलाइन व ड्रेनेज कामे झोन अधिकारी तपासून ताब्यात घेतील. रस्त्याची कामे अर्धवट असतील तर ती नमूद करून ताब्यात घेण्यात येणार आहेत.

प्रकल्पनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी तरतूद व खर्च
रंगभवन येथे पब्लिक प्लाझाच्या देखभाल कामासाठी पाच वर्षे निश्चित केली. तरतूद ५० लाख, आतापर्यंत खर्च २६ लाख.
होम मैदान येथे वाॅकिंग ट्रॅक देखभालीसाठी ३ वर्षे निश्चित तरतूद २० लाख, खर्च १९ लाख.
चिल्ड्रन पार्क देखभाल कामासाठी ३ वर्षे निश्चित. तरतूद ३० लाख, आतापर्यंत खर्च २७ लाख.
हुतात्मा बाग देखभाल कामासाठी ३ वर्षे निश्चीत केले तरतूद १७ लाख, आतापर्यंत खर्च १३.५ लाख.
स्ट्रीट बझार देखभाल कामासाठी ३ वर्ष निश्चित. तरतूद १५ लाख, आतापर्यंत खर्च ४.५ लाख.
स्मार्ट सिटीची कामे महापालिका ताब्यात घेताना तपासून घेणार आहे. सिध्देश्वर मंदिर येथे केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीस पत्र देण्यात आले.

पी. शिवशंकर, पालिका आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...