आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपंचायती होणार स्मार्ट:लोकसहभाग, सीएसआर फंड अन् स्वनिधी वापराची मुभा; शहर सौंदर्यीकरण अभियान जोरात

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमुळे अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये झालेल्या विकासकामांमध्ये चेहरा-मोहरा बदलला आहे. त्याच धर्तीवर नगरविकास मार्फत शहर सौंदर्यीकरण अभियान नगरपंचायत हद्दीमध्ये राबवण्यात येणार आहे. पण, त्यासाठी शासनाने थेट निधीच्या तरतूदीऐवजी लोकसहभाग, सीएसआर फंड व स्वनिधी वापराची मुभा दिली आहे. सोलापूर शहरातील 16 चौकांत स्मार्ट ट्रॅफिक सिस्टिम आणि 116 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. या निर्णयाचे कौतुक होत आहे.

शहर सौंदर्यीकरण अभियानाबाबत स्वतंत्र मार्गदर्शिका राज्यशासनाने जाहिर केली आहे. शहराचे ब्रॅंडिंग करणे, मध्यवर्ती चौकांची स्वच्छता, सुशोभीकरण, भिंती चित्रे, कारंजे, शिल्प उभारणे, सामाजिक संदेश जागृती, वृक्षारोपण, दुभाजकांचे सुशोभीकरण, सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामान्य माणूस सुखाने जगण्याचे शहर, सुरक्षित शहर व्हावे या संकल्पनेतून स्मार्ट सिटीची बांधणी करण्याचे नियोजन आहे. त्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरुवात झाली आहे.

तज्ज्ञांची नियुक्ती

शहर सौंदर्यीकरण अभियानच्या अंमलबजावणीसाठी शहराच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत असणाऱ्या आयुक्त, मुख्याधिकारी, शहर अभियंता, नगर अभियंता, नगर रचनाकर, आरोग्य विभाग, स्वच्छता अधिकारी, निमंत्रित सदस्य, अधिकृत बांधकाम विकासक संघटनांचे प्रतिनिधी, वास्तूविशारद, नामांकित शैक्षणिक संस्था, कलावंत यांचा एक कार्यकारी समुह गट तयार करण्यात येईल.

आकर्षक सेल्फी पाॅईंट

या माध्यमातून शहरातील स्वच्छता, जागांची निश्चिती आणि शहराच्या साैंदर्यीकरणाबाबत नवीन संकल्पना मांडायच्या आहेत. या स्थानिक संस्कृती, शहराची परंपरा, इतिहास जोपासून सोलापूर शहराचे ब्रॅंडिंग करण्यासोबतच आकर्षक सेल्फी पाॅईंटची उभारणी करण्याचाही प्रशासनाचा मानस आहे.

बातम्या आणखी आहेत...