आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम सेवेत नियुक्तीपत्र:मनपा ; 131 पैकी 95 कर्मचाऱ्यांना मिळाले कायमचे नियुक्तीपत्र

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौदा वर्षांचा लढा आणि पाठपुराव्यानंतर १३१ कर्मचाऱ्यांची सेवेत कायम होण्याची स्वप्नपूर्ती मंगळवारी झाली. यापैकी ९५ जणांना कायम सेवेत नियुक्तीपत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यापुढील काळात महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवू नये, त्यामुळे वेळ जातो, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.

महापालिका सभेत २६ ऑक्टोबर १९९५ रोजी केलेल्या ठरावानुसार, पालिकेतील रोजंदारी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करण्यात येत होते. १३१ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न १४ वर्षांपासून प्रलंबित होता. तो शासनाने निकाली काढत कायम करण्याचा आदेश नगरविकास विभागाने पालिका आयुक्तांना काढला. त्यानुसार १३१ कामगारांची कागदपत्राची तपासणी करून ९५ जणांना नियुक्तीपत्र दिले.

या वेळी आमदार प्रणिती शिंदे, सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, माजी नगरसेवक चेतन नरोटे, कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर आदी उपस्थित होते. या निणर्याचे कामगार नेते जानराव यांनी स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...