आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:चौदा वर्षांच्या मुलाचा खून; आराेपीस जन्मठेप, दंड, किरकाेळ भांडणातून प्रकार, डाेक्यात दगड घालून खून

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नान्नजमधील चौदा वर्षे वयाच्या अमीर नबीसाब मुजावर यास घरातून नेऊन रुमालाने गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी १९ वर्षांच्या आरोपीला जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी ठोठावली. अरबाज अय्युब शेख (१९, रा. नान्नज) असे आरोपीचे नाव आहे.

आराेपी अरबाज याने ११ जानेवारी २०२० रोजी अमीरला घरातून बाहेर बाेलावून नेले. राज बिअर शाॅपीतून दाेन दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. गावातील शाळेच्या पाठीमागील झाडीत नेऊन दारू पाजली. यानंतर दोघांत वाद झाल्याने त्यास नान्नज ते मार्डी रोडवरील प्रशांत बिचडू यांच्या शेतात नेऊन रुमालाने गळा आवळला. डोक्यात दगड घालून अमीरचा खून केला. त्याचा मोबाइल आपल्या स्वत:च्या घरी नेऊन ठेवला. अमीर घरी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. गावातील नागरिकांच्या मदतीने आरोपीस तालुका पोलिस ठाणे येथे नेले. पोलिसांच्या चौकशीत खून केेल्याचा गुन्हा आरोपीने कबूल केला. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलिस उपनिरीक्षक अनिल देवडे यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस नाईक सुमन वाडे यांनी काम पाहिले.

१९ साक्षीदार तपासले मृताचा शवविच्छेदन अहवाल, डॉक्टरांची साक्ष, न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, पंचनामा यावरून खून झाल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. तो ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, मृताच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.

बातम्या आणखी आहेत...