आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:वडकबाळ येथे तरुणाचा खून; मंद्रूप पोलिसात गुन्हा, संशयितांना घेतले ताब्यात

दक्षिण सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वडकबाळ येथील नाईकनगर तांड्याजवळ एका तरुणाचा गळा आवळून व लाकडाने मारून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती वरून मंद्रूप पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे फिरवत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय भुताळी पुजारी (वय ३९ रा. नाईकनगर तांडा, वडकबाळ ता. दक्षिण सोलापूर) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुजारी हा नाईकनगर येथे राहत होता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुजारी हा पडल्याची माहिती पोलिस पाटील अशोक पुजारी यांच्याकडून मंद्रूप पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय सय्यद व इतर घटनास्थळी दाखल झाले. मृत पुजारी यास लाकडी फळीने कपाळावर व उजव्या कानावर मारून गंभीर जखमी केले होते. तसेच त्याच्या गळ्याभोवती पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळा आवळून जीवे ठार मारल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. काहींना ताब्यात घेतले आहे.