आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निरागसतेला धर्म नसतो:मुस्लिम बालकांनी घेतले गणेशाचे दर्शन, ग्रामस्थांना मिळाला सामाजिक एकोप्याचा संदेश

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,

इंसान की ओलाद है इंसान बनेगा.

कुदरत ने तो बनाई थी

एक ही दुनिया, हमने उसे हिंदू और मुसलमान बनाया,तू सबके लिए अमन का पैगाम बनेगा, इंसान है इंसान की ओलाद है इंसान बनेगा..''

पापरी (ता. मोहोळ) येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन मुस्लिम मुले भोसले चौकातील नवयुग गणेश तरुण मंडळाच्या गणेशाची पूजा करत, मूर्तिस गंध लावत हात जोडून दर्शन घेत होते तेव्हा हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठी या गिताच्या ओळी आपसूकच येत होत्या.

लहान मुले निरागस, निष्पाप असतात त्यांच्या मनात कोणताही जात धर्म वर्ण आदि भेदभाव नसतो, त्यांचे अंतःकरण शुद्ध असते. देवाला व श्रद्धेला ही जात धर्म नसतो म्हणूनच मुलांना देवाचे रूप मानले जाते. पापरी येथील अरमान मुलाणी व अलिफ मुलाणी ही दोन बालके आपल्या घरच्यांनी दूध आनायला सांगितले म्हणून रस्त्याने जात होती, त्यांची नजर भोसले चौकात रस्त्या शेजारी बसविलेल्या नवयुग गणेशाच्या मूर्ति कड़े गेली. आज गणपती विसर्जन होणार म्हणून दोन्ही भावंडे श्री गणेशाजवळ जाउन पूजा करत हात जोडून दर्शन घेवून गेली.

या मुलाणी भावंडाच्या या कृतीने गावात तेथे उपस्तीत असलेल्या ग्रामस्थांना सामाजिक एकोप्याचा संदेश मिळाला आहे.

0