आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्लाहच्या हातातील दोरी मजबूत करा. कोणाच्या वादात, भांडणात पडू नका. पोलिसांना मदत करा. इट का जवाब पत्थरसे नही मोहब्बतसे दो. तुम्ही आकाश बना, त्यामुळे थुंकणाऱ्यांच्याच तोंडावर थुंकी पडेल. मुलांच्या हातात पुस्तक द्या. गरजूंना शिक्षणासाठी मदत करा. मुस्लिम समाज पोलिस, प्रशासन, न्यायालय, सैन्यात कमी आहे. त्यात जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. ते करा, असे मार्गदर्शन शहर काझी मुफ्ती अमजदअली सय्यदअली अब्बास काझी यांनी केले. होटगी रोडवरील ईदगाह मैदान येथे रमजान सणानिमित्त नमाज अदा झाल्यानंतर काझी बोलत होते.
कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर रमजान उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. रमजाननिमित्त होटगी रोड येथील आलमगीर ईदगाह मैदान येथे सकाळी ९ वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून होटगी, विजापूर रोड, सात रस्ता, नई जिंदगी, शास्त्रीनगर, कुमठा नाका परिसरातील मुस्लिम बांधव येत होते. होणारी गर्दी पाहता पोलिसांनी वाहतूक मार्ग बंद केले. ९ वाजता नमाज पठण सुरू झाले. ईदगाह मैदान तिन्ही बाजूने भरले होते. नमाज पठण झाल्यानंतर शहर काझी मुफ्ती अमजदअली सय्यदअली अब्बास काझी यांनी शिक्षण, नोकरी, शांतता यावर आकडेवारीसह भाष्य केले. यानंतर मुस्लिम बांधवांनी रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
बंधुभावाचे दर्शन
दोन वर्षांच्या खंडानंतर रमजान उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा
सोलापूर
अल्लाहच्या हातातील दोरी मजबूत करा. कोणाच्या वादात, भांडणात पडू नका. पोलिसांना मदत करा. इट का जवाब पत्थरसे नही मोहब्बतसे दो. तुम्ही आकाश बना, त्यामुळे थुंकणाऱ्यांच्याच तोंडावर थुंकी पडेल. मुलांच्या हातात पुस्तक द्या. गरजूंना शिक्षणासाठी मदत करा. मुस्लिम समाज पोलिस, प्रशासन, न्यायालय, सैन्यात कमी आहे. त्यात जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. ते करा, असे मार्गदर्शन शहर काझी मुफ्ती अमजदअली सय्यदअली अब्बास काझी यांनी केले. होटगी रोडवरील ईदगाह मैदान येथे रमजान सणानिमित्त नमाज अदा झाल्यानंतर काझी बोलत होते.
कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर रमजान उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. रमजाननिमित्त होटगी रोड येथील आलमगीर ईदगाह मैदान येथे सकाळी ९ वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून होटगी, विजापूर रोड, सात रस्ता, नई जिंदगी, शास्त्रीनगर, कुमठा नाका परिसरातील मुस्लिम बांधव येत होते. होणारी गर्दी पाहता पोलिसांनी वाहतूक मार्ग बंद केले. ९ वाजता नमाज पठण सुरू झाले. ईदगाह मैदान तिन्ही बाजूने भरले होते. नमाज पठण झाल्यानंतर शहर काझी मुफ्ती अमजदअली सय्यदअली अब्बास काझी यांनी शिक्षण, नोकरी, शांतता यावर आकडेवारीसह भाष्य केले. यानंतर मुस्लिम बांधवांनी रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.