आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Muslim Reservation | Owaisi | MIM | Why The Reservation Of Backward Muslims Is Not Taken Seriously More Than The Maratha Community; MP Owaisi's Question At The Workers' Meeting In Solapur

मुस्लिम आरक्षण:मराठा समाजापेक्षा मागास मुस्लिमांच्या आरक्षणाचा विचार गांभीर्याने का होत नाही; सोलापूरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार ओवेसींचा सवाल

प्रतिनिधी । सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाच्या आरक्षणाला विराेध नाही, पण मराठा समाजाच्या तुलनेत मुस्लिम मागासलेला आहे. न्यायालयानेही सहमती दर्शवली, तरीही सरकार मुस्लिमांच्या आरक्षणाचा विचार का करत नाही, असा सवाल ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाचे खासदार असदुद्दीन आेवेसी यांनी येथे केला.

शैक्षणिक प्रवाहातून मुस्लिम विद्यार्थ्यांच्या गळतीस गरिबी हेच कारण आहे. प्राथमिक शिक्षणात त्यांचे प्रमाण २२ टक्के तर पदवीतले प्रमाण केवळ ४ टक्के आहे. आता गप्प बसून चालणार नाही, असा इशारा देताना त्यांनी ११ डिसेंबरच्या आंदोलनाची हाक दिली. मुंबईतील आझाद मैदानात एकवटण्याचे आवाहन त्यांनी केले.

मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये एमआयएम पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बाेलत होते. धरणात पाणी नाही तर मी..असा शब्द प्रयोग करणाऱ्यापैकी मी नाही. भाजप तर मुस्लिमांचा उघड विरोध करते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लिमांचा घात केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही.

परंतु आर्थिक परिस्थिती आणि मागासलेपणा पाहून आरक्षण द्यावे. मुस्लिमांना न्याय द्यावा. बॅँकाकडून मराठा समाजाला ४० टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्केच कर्ज दिले जाते. राज्यात एकही मुस्लिम आयपीएस अधिकारी नाही तर मराठा समाजाचे २८ टक्के आहेत. मुस्लिम समाजाची ६७ टक्के कच्चे घरे आहेत.

वाहनाला नंबरप्लेट नसल्यामुळे २०० रुपयांचा दंड
ओवेसी सोलापूर दौऱ्यावर ज्या वाहनातून आले होते त्याला पुढील बाजूस नंबर प्लेट नसल्यामुळे सोलापूर वाहतूक पोलिसांनी नंबरप्लेट नसल्यामुळे मूळ वाहनमालकाच्या नावे २०० रुपयांचा दंड केला. (टी एस ११ इव्ही ९९२२) या चारचाकी वाहनातून हैदराबाद येथून ते सोलापुरात आले होते.

बातम्या आणखी आहेत...