आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनलचा विजय:मुस्ती विकास सोसायटीवर पुन्हा पाटील-जमादार गटाचेच वर्चस्व; पंकज पाटील यांच्या पॅनलचा पराभव

दक्षिण सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्ती विकास सोसायटीच्या निवडणुकीत माजी सभापती कल्याणराव पाटील व भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच नागराज पाटील यांच्या जय किसान विकास पॅनलने सर्व तेरा जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले. विरोधी सुनील कळके, महादेव पाटील व पंकज पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला.

पाटील-जमादार गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, कर्जदार मतदार संघातून नागराज पाटील (२०२ ), आणाराव दिंडेगावे (१९१), महादेव गाडवे (१८५),महादेव मोरडे (१८५), सतीश कळके (१८५),रविकिरण मेहता (१८३), संदीप पाटील (१८२), नितीन चव्हाण (१७९), इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून मुतन्ना जमादार (१९५),अनसूचित जाती जमाती मतदारसंघातूनलक्ष्मण माने (१९२), भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून प्रभाकर देवकर (१८५),महिला राखीव मतदारसंघातून जोत्स्ना पाटील (१८६) व नंदिनी भोसले (१८६) विजयानंतर सभापती भीमाशंकर जमादार व पॅनल प्रमुख सरपंच नागराज पाटील यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपसरपंच रमेश चव्हाण, अशोक पाटील, सुभाष शिंदे, राजेंद्र गायकवाड, डॉ दीपक नारायणकर, सिद्देश्वर कस्तुरे, सिद्धेश्वर कोरे, सैपन तांबोळी, अशोक कस्तुरे. अमीन मानियार, गौतमबुद्ध गायकवाड, सुधाकर गायकवाड, विजय चव्हाण, बालाजी जमादर, सागर कळके, इलाई तांबोळी, शाम जाधव, चिदानंद बिराजदार, देवराज बिराजदार, प्रशांत पाटील, शैलेश पाटील, संतोष चव्हाण, ओंकार पाटील, शेकू मुजावर, नसीर तांबोळी, तात्या पवार, महेश मिटकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...