आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा पुरस्कार सोहळा:मंद्रुप ग्रामपंचायतीचा राज्यात दुसरा क्रमांक, गावकऱ्यांच्या एकजुटीला यश

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत यावर्षीच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिका,नगरपालिका व ग्रामपंचायतीचे निकाल आज (दि.5 जून) जाहीर करण्यात आले. मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतने राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण करण्यात आले. पर्यावरण मंत्रालय सचिव मनीषा म्हैसकर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, सम्राट फडणीस यांची उपस्थिती होती.

मंद्रुपचा पुरस्कार सरपंच कलावती खंदारे, माजी सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ, ग्रामसेवक नागेश जोडमोटे,नोडल अधिकारी कृषी विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी स्वीकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे सखोल मार्गदर्शन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकदे, तालुका संपर्क अधिकारी चंचल पाटील, तत्कालीन गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या प्रेरणा व कार्यकर्तृत्वामुळेच दक्षिण पंचायत समिती मधील मंद्रप ग्राम पंचायतीने राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकाविले.

सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, कृषी अधिकारी महेश नारायणकर,विस्तार अधिकारी पंचायत राजशेखर कमळे, अमर दोडमनी, बाबासाहेब पाटील, श्रीमती अश्विनी ओव्हाळ, जे.पी .माने, शंकर पाटील ,मंद्रूप येथील निसर्गप्रेमी पत्रकार विनोद कामतकर यासह गावातील रहिवासी यांचेही अभियानात मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्कार प्राप्त झाल्याने जिल्हा भरातून ग्रामपंचायत व दक्षिण सोलापूर पंचायतचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे

आम्ही मंद्रुपकरचे योगदान

मंद्रूप मधील युवकांनी एकत्रित येत आम्ही मंदृपकर पथक सुरू केले. रानवेध फाऊंडेशनच्या मार्गदर्शन, लोकसहभागद्वारे गावात पर्यावरण जागृती वृक्ष लागवड संवर्धन करण्यात येते. धुळवडीला गावातील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता या पथकाने केली होती. तेथील झाडांना अळ करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. स्मशानभूमीतील राख गोळा करून त्या झाडाला घातली. स्थानिक प्रजातीची अनेक झाडं त्या ठिकाणी लावली. त्या ठिकाणी पक्षीधाम उभारून पक्ष्यांसाठी पाणपोई, चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवली आहेत. या अभिनव उपक्रमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गावाच्या कल्पणाशक्तीला सन्मान

सर्व मंद्रुपकरांच्या कल्पणाशक्तीला मिळालेला हा सन्मान आहे. भविष्यात देखील आपण मंद्रुपच्या निसर्गाचं नंदनवन फुलवत ठेवण्याचं कर्तव्य, आपण सर्वानी एकजुटीने निभावून घेऊन जाऊ. असे रवी केवटे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...