आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाफ, पिंजारी, मन्सूर जमात पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय मेळावा:संघटीत व्हा, सत्तेचा हिस्सा मिळवा; आरिफ मन्सूरी यांचे आवाहन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र असो किंवा देशात प्रत्येक तालुक्यात नदाफ, पिंजारी, मन्सूर जामतीचे लाेक आहेत. राज्यात सुमारे 25 लाख लाेकसंख्या आहे. त्यामुळे संघटीत व्हा आणि सत्तेचा हिस्सा मिळवा, असे आवाहन जमियतूल मन्सूर महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष आरिफ मन्सूरी यांनी केले.

जमितयतूल मन्सूर महाराष्ट्रच्यावतीने 27 ऑगस्ट रोजी फडकुल सभागृहात नदाफ, पिंजारी, मन्सुरी जमातीच्या पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत होते.

एकत्र येण्याची गरज

ते पुढे म्हणाले, नदाफ, पिंजारी, मन्सूर जमातीच्या विकासासाठी ज्येष्ठांनी खुप परिश्रम घेतले. त्यामुळे आज आपण येथे आहोत. आज महाराष्ट्रात सुमारे 40 नगरसेवक आहेत. आज तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकसंघ झाल्यास आपल्यातूनच आमदार, खासदार आणि आयपीएस अधिकारी दिसतील.

इतिहास समजून घेणे गरजेचे

गावपातळीपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना जमातीच्यावतीने खर्च करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. आज एक गरीब मुलगी युपीएससी परिक्षेची तयारी करत आहे. आपल्या मुलींवर अत्याचार झाले असून न्यायालयीन लढा आपण देत आहोत. स्वातंत्र लढ्यात असंख्य नदाफ, पिंजारी, मन्सूर जमातीच्या लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. तो इतिहास सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.

देशाची ताकद वाढवा

जमियत उलमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम कासमी म्हणाले, पूर्वी व्यवसाय, अडनाव, राहणीमान यावरून जमातींचा जन्म झाला. परंतु इस्लाम कुराणच्या माध्यमातून सांगताेय की, सर्व मानव जाती एकच आहे. त्यासाठी एकमेकांसोबत एकदिलाने रहा आणि देशाची ताकद वाढवा. वेळ प्रसंगी आर्धी भाकर खावा पंरतु मुलांना शिक्षण द्या. कारण बुध्दीची श्रीमंत हीच खरी श्रीमंती आहे. शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यात खुप काही बदल होत असतो.

योजनाबाबत सकारात्मक चर्चा

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ.अजीज नदाफ, हाजी के. बी. नदाफ, हाजी मिरा नदाफ, हसीब नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. तसेच यावेळी व्यासपीठावर प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि पुढील नियोजन बाबत सकारात्मक चर्चा करण्यात अली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरदार नदाफ यांनी केले तर आभार सादीक नदाफ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...