आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक परिषदेच्या मागणीला यश:राज्य शिक्षक पुरस्काराला सावित्रीबाई फुले यांचे नाव

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराला सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार असे नाव देण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या मागणीला यश आहे, अशी माहिती प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली. मागील पाच वर्षापासून शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे नाव देण्यासाठी सातत्यान पाठपुरावा केला. त्याला यश आले असून महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला आता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव दिले आहे. या निर्णयाचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, लक्ष्मण नेव्हल, प्रदीप सोळुंके, विनोद आगलावे,संतोष माशाळे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...