आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विमानतळाच्या जागेवर प्राधिकरणाचे नाव लावा; प्रांताधिकाऱ्यांना व्यवस्थापकाचे पत्र

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळाच्या जमिनीचा संपादन निवाडाच उपलब्ध नसल्याने ती जमीन संपादित केली की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण १९५३ साली निवाडा झाल्याची कागदपत्रे मिळाल्याने उताऱ्यावर नाव लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन नाव लावलेल्या ६१ एकर उताऱ्यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्याची मागणी विमानतळाचे व्यवस्थापक बाणोथ चम्प्ला यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

विमानतळासाठी मजरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीचे १९५३ साली संपादन झाले. राज्य व केंद्र शासनाच्या वादात जमिनीचा मोबदला प्राधिकरणाने दिल्याचे समोर आले. यामुळे या जमिनीवरील महाराष्ट्र शासनाचे नाव कमी करून प्राधिकरणाचे नाव लावण्याची मागणी केली आहे.

नवीन गट क्रमांक ७१/१ चे ३६ एकर २४ गुंठे, नवीन गट क्रमांक ७१/२ चे २५ एकर ०९ गुंठे या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव आहे.तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी या जमिनीवरील मिळकतदारांची नावे कमी करून महाराष्ट्र शासन नाव लावले. वरील गट क्रमांकाच्या उताऱ्यावर नावे लावण्याबाबत न्यायालयाची स्थगिती वा वाद प्रलंबित नाही, असे पत्रात नमूद आहे.

कोर्ट कज्जाविषयी खातरजमा करून उताऱ्यावर नाव लावू
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या ६१ एकर जमिनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्याबाबत अर्ज केला आहे. याबाबत मंडलाधिकारी व तलाठी यांना पत्र दिले आहे. विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीबाबत न्यायालयीन प्रकरण सुरू आहे का? न्यायालयात वाद प्रलंबित आहेत का? याचीही खातरजमा करण्यात येईल.’’-हेमंत निकल, प्रांताधिकारी

बातम्या आणखी आहेत...