आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नान्नज विकास सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात; तेरा पैकी 12 जागांवर विजय, सत्ताधारी गटाचा उडाला धुव्वा

उत्तर सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नान्नज विकास सोसायटीच्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने १३ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. एक जागा अवघ्या चार मताच्या फरकाने गमावली आहे. गेल्या काही वर्षापासून सोसायटीच्या माध्यमातून होत असलेले कर्जरोखे बंद असल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आहे.

शनिवारी नान्नज, ता. उत्तर सोलापूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निवडणुकीत बाजार समिती संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश चोरेकर यांच्या रेणुकामाता शेतकरी विकास आघाडी पॅनेलचे १३ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. सत्ताधारी दिलीप माने गटाच्या शेतकरी महाविकास आघाडीचा एकच उमेदवाराचा विजय झाला.

सर्वसाधारण कर्जदारमधून ८ उमेदवार, महिला प्रतिनिधी २ उमेदवार, इतर मागासवर्गीय- १, अनुसूचित जाती जमाती -१, भटक्या वि.जात -१ असे एकूण-१३ उमेदवार निवडून द्यायचे होते. एकूण ३५४ मतदानापैकी २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नान्नज विकास सोसायटीवर एक हाती सत्ता मिळवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी सरपंच वैजनाथ गवळी, भारत गवळी यांच्याकडे होते. या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे वर्चस्व वाढले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी पॅनलचा विजय होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हलगी ढोल ताशाच्या गजरात विजयी जल्लोष मिरवणूक काढली.

या वेळी राष्ट्रवादीचे सुनील भोसले, भारत बोंगे, दीपक अंधारे, शिवाजी आवटे, मंजूर शेख, हाणमंत टोणपे, श्रीकांत मुळे, शिरीष म्हमाणे उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरी व्होटकर यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवार
चंद्रकांत भोसले, वैजिनाथ बोंगे, प्रकाश चोरेकर, अभिमन्यू गवळी, श्रीमंत गवळी, हाणूमंत कोरे, लक्ष्मण कोरे, कालिदास मुळे, कांचन म्हमाणे, उर्मिला तोडकर, दिलीप वगरे, शिवाजी आवटे, अर्जुन जानराव.

बातम्या आणखी आहेत...