आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माढा:नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या माढ्यातील  पोलीस उपनिरिक्षकाने पहिली पगार  दिली कोरोनाच्या मदतीसाठी

माढाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गोरगरीब वंचिताना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले

संदीप शिंदे

पोलिस उपनिरिक्षक झालेल्या अक्षय औदुंबर गायकवाड या माढ्यातील तरुणाने आपली पहिली पगार कोरोना च्या दुष्टचक्रात अडकलेल्यांसाठी दिली आहे. माढा शहरातील शुक्रवार पेठेत राहत असलेल्या अक्षयची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाली. तो नाशिक येथे प्रशिक्षण घेत आहे. त्यांची पहिली पगार येताच त्यांनी राज्यावर आलेल्या संकटाचे भान राखून केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून खाकी वर्दीत सामजिक बांधिलकी असल्याचे दाखवुन दिलय.

अक्षयला मिळालेल्या पहिल्या पगारातुन निम्मी पगार सरकाराने कोरोना ग्रस्तांसाठी घेतली आहे.असे असताना देखील अक्षयने उर्वरीत राहिलेल्या पगारातुन माढ्यातील गोरगरीब वंचित कुटूंबियांना जिवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात दिलाय. गावभर भंटकती करुन गुजराण करीत हातावरचेे पोट असलेल्या  १५  गोरगरीब वंचित कुटूंबियांना १५ दिवस पुरेल इतक्या जिवनावश्यक साहित्याचे किट दिले आहे.अक्षय गायकवाड हे नाशिक मध्येच प्रशिक्षण घेत असल्याने  त्यांच्या  आई  वडिलांनी आपल्या मुलाची समाजभान असल्याची   तळमळ/जाण  पाहुन     गोरगरिबांच्या घरा पर्यत जाऊन आई सविता व वडील औदुंबर यांनी ही   मदत दिली आहे.आपल्या  मित्राच्या कार्याचा अभिमान बाळगत अक्षय च्या मित्र परिवाराने देखील साहित्य वाटपात मदत केली आहे. अक्षय चे वडिल औदुुंबर हे शहरा तील मनकरणा पतसंस्थेत पिग््मी एजंंट म्हणुुन काम करतात.गरिबीची जाण ठेवत अक्षय  गोरगरिबांच्या मदतीला धावून आलाय

बातम्या आणखी आहेत...