आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा भूलतज्ज्ञ संघटनेतर्फे परिषदेच आयोजन:सोलापुरात भूलतज्ज्ञांची उद्या राष्ट्रीय परिषद

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा भूलतज्ज्ञ संघटनेतर्फे राष्ट्रीय परिषदेचे २८ ऑगस्ट रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी दिल्ली, पतियाळा, कोईमतूर, हुबळी आदी ठिकाणांसह देशभरातील संघटनेचे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कविता निवर्गी व डॉ. वैशाली येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेसाठी अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्यंकटगिरी व सचिव डॉ.नवीन मल्होत्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भूलतज्ज्ञ हे प्रगतिशील शास्त्र असून त्यात नवनवीन संशोधन होत असते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला सुरक्षित व वेदनारहित भूल देण्याचे कार्य भूलतज्ज्ञ करीत असतात, असे निवर्गी यावेळी बोलताना म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...