आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरव समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ११ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. २३ वर्षानंतर दुसऱ्यावेळी सोलापुरात राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन ढेपे यांनी दिली.
गुरव समाजाचे पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन पंढरपूर येथे १९९९ मध्ये पार पडले होते. या अधिवेशनास तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित राहिले होते. २३ वर्षानंतर गुरव समाजाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन सोलापुरात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात बैठकांचे सत्र सुरू आहे. महाअधिवेशनास किमान एक लाख गुरव समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती, नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन ढेपे यांनी दिली. याचे स्वागताध्यक्ष विजयराज शिंदे असून नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन ढेपे, राष्ट्रीय महासचिव मल्लिकार्जुन गुरव आहेत.
या आहेत समाजाच्या मागण्या
मराठा समाजाच्या धर्तीवर गुरव समाजासाठी संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अनेक मंदिरातील पुजाऱ्यांवर गावातील धनधांडगे आणि गुंड प्रवृतीचे लोक अन्याय करत असून, त्यांना संरक्षण देण्यात यावे, तसेच पत्रकारांच्या धर्तीवर कायदा करण्यात यावा, ज्या देवस्थानमध्ये उत्पन्न नाही, तेथील पुजाऱ्यांना दरमहा २५ हजार मानधन देण्यात यावे, राज्यातील देवस्थान शासकीय समितीवर गुरव समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, गुरव समाजाच्या नावावर असलेल्या इनामी जमिनी खालसा करून त्यांना पीक कर्ज, विमा आदींचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्या या अधिवेशनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत.
समित्यांसह पाचशे स्वयंसेवक
शासकीय मैदानात ८० बाय ६० फुट आकाराचे व्यासपीठ असणार आहे. त्याशिवाय नियमानुसार पूर्ण मैदानावर मंडपाची साेय आहे. विजापूर रोडवरील जागृती विद्या मंदिर आणि गोशाळा परिसर वापरला जाणार आहेत. तसेच डीएड विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची साेय करण्यात आली आहे. एक आरोग्य केंद्र सुध्दा असणार आहे. शहराच्या चारही दिशांना माहिती फलक लावण्यात येणार आहेत. तसेच हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांसह पाचशे स्वयंसेवकांना नेमण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.