आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्म्यांवर टीका करणाऱ्यांच्या हाती देशाचे नेतृत्व:धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचे काम सुरू, शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. देशाचे राजकारण वेगळ्या दिशेला जात असून धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचे काम सुरू आहे. देशासाठी हुतात्म पत्करणाऱ्यांवर देशाचे नेतृत्व टीका करत आहे. यामुळे देशात अस्वस्थता आहे, आपल्याला धर्मांध शक्तींविरोधात लढावे लागणार आहे, असे ही शरद पवारांनी म्हटले आहे. सांगलीत शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.

विकासात्मक राजकारणाची या देशाला गरज - पवार
सांगलीत बोलताना पवारांनी राज्य सरकारवर चांगलीच स्तुती सुमने उधळली आहे. यावेळी बोलताना राज्य सरकार केंद्र सरकार सारखे चालत नाही त्यांचर काम करण्याची पद्धत वेगळी आहे. असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास होत असल्याचेही सांगितले आहे. तर राजकारण सुद्धा सर्वसामान्यांना न्याय देणारे असायला हवे, विकासात्मक राजकारणाची या देशाला गरज आहे, असा टोला पवारांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

केवळ ऊसाच्या भरोश्यावर बसता येणार नाही
राज्यात 90 पेक्षा जास्त कारखाने जून महिन्यापर्यंत सुरू राहतील अशी स्थिती आहे. कारण राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. ईतक्या ऊसाचा गळीत कसा होणार हा प्रश्न मला पडला आहे. ब्राझील, अमेरिकेमध्ये इथेनॉलचा वापर वाढतोय, आपल्या पंतप्रधानांनीदेखील त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलीय असे पवारांनी सांगितले. यावेळी बोलताना शेतकऱ्यांना उद्देशुन पवारांनी आता केवळ साखर एके साखर करून चालणार नाही असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...