आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा नीट-यूजी २०२३ रविवारी सोलापूरसह देशभरातील ४९९ शहरांत होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण २२ केंद्रांतून सुमारे आठ हजार जण ही परीक्षा देतील. ती दुपारी २ ते ५.२० या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या किमान एक ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहे.
परीक्षार्थींची संख्या मोठी
परीक्षा केंद्रावर असणारे सीसीटीव्हींचे प्रसारण थेट एनटीएकडे असणार आहे. देशातील वैद्यकीय, डंेटल, कॉलेजबरोबरच आयुष, युनानी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते. यावर्षी देशभरातील २० लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यातही विद्यार्थिनींची संख्या साडेबारा लाख इतकी आहे. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातील.
परीक्षा केंद्रावर असलेल्या सीसीटीव्हीद्वारे एनटीए प्रमुख कार्यालयात परीक्षा यंत्रणेवर नजर असेल. परीक्षार्थींना कडक तपासणीनंतरच प्रवेश मिळणार आहे. परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी केंद्राचे फाटक बंद होतील. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतरच प्रवेश मिळत असल्याने परीक्षेपूर्वी किमान दीड तास केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पार पाडायची आहे.
परीक्षार्थींना कडक तपासणीनंतरच प्रवेश काॅपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी परीक्षार्थींची कडक तपासणी होणार आहे. त्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. परीक्षेच्या अार्धा तास आधी केंद्राचे फाटक बंद हो ईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोणालाही प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतरच प्रवेश मिळत असल्याने परीक्षेपूर्वी किमान दीड तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पार पाडायची आहे.
कडक तपासणी, नियम आणि वाद
परीक्षेचे कडक वातावरण विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पचनी पडत नाही, असा अनुभव आहे. परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा कक्षात प्रवेश करण्याचा नियम वादाचा ठरतो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी तपासणी करून सोडणे शक्य होत नसल्याने ऐन परीक्षेच्या वेळी गर्दी होते. त्यामुळे परीक्षा कक्षात आत जाताना लांब बाहीचा शर्ट, बुट, कोणतेही दागिने, कानातील, हातातील दागिने, मोबाइल, बॅग, ट्रान्सपरंट नसलेल्या वस्तूंना बंदी आहे. यामुळे तपासणी वेळी वाद होतात. ही परीक्षा वर्षातून एकाच वेळी होत असल्याने विद्यार्थ्यांनी सर्व नियमांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.