आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनगर आरक्षणाचा मुद्दा:समान नागरी कायद्याची नव्हे तर उपेक्षित समाजांना आरक्षणाचीच गरज; उदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांचा घरचा आहेर

संदीप शिंदे | माढा (सोलापूर)7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा समाज मागतोय म्हणून आम्ही मागतोय असे मुळीच नाही - गोपीचंद पडळकर

अनेक दुर्लक्षित उपेक्षित समाज घटकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाची गरज आहे. ते राहिले पाहिजे. सध्या समान नागरी कायदा नव्हे, आरक्षणाची आवश्यकता असल्याचे वक्तव्य करतानाचा धनगर समाजाला लवकर आरक्षण द्यावे अन्यथा येत्या काळात गाव खेड्यातले तरुण पोरं मंत्र्याच्या गाड्यांवर दगड फेकायला कमी करणार नाहीत. सरकारने ही वेळ येऊ देऊ नये. अशी भूमिका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. माढा येथे दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी समान नागरी कायदा असायला हवा असे मत नुकतेच व्यक्त केले. त्यावर गोपिचंद पडळकर यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, उदयनराजे हे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे ते स्वतःच मत आहे. मात्र सध्या समान नागरी कायदा नव्हे तर आरक्षणाची गरज आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, मराठा समाज मागतोय म्हणून आम्ही मागतोय असे मुळीच नाही. 70 वर्षापासूनची आमची आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. सरकारने इच्छाशक्ती दाखवुन धनगर समजाला आरक्षण द्यावे. अन्यथा समाजाचे तरुण मंत्र्याच्या गाड्यावर दगड टाकायला कमी करणार नाहीत. सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने चर्चा, बैठक अथवा आरक्षणाची भूमिका देखील जाहीर केलेली नाही. मागच्या सरकारने दिलेले 1 हजार कोटी रुपये या सरकारने लॅप्स केले. हे पैसे अर्थसंकल्पात धरलेले आहेत. हे रद्द होत नसताना राज्य सरकारने जाणुन बुजून रद्द केल्याचा आरोप करीत यामुळे 35 हजार समाजातील तरुणांना वसतिगृहाचे पैसे मिळणार होते ते मिळाले नाही.

उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आटोपून परत जाताना त्यांनी माढ्यात समाजबांधवांची भेट घेऊन मार्गदर्शन केले. त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक समीर सापटणेकर,माऊली हळणकर, निलेश बंडगर, बालाजी नाईकवाडे, अमोल खरात, सत्यवान पांढरे, सिद्धेश्वर मारकड, संतोष माने, अरविंद नाईकवाडे, नितीन शिंगाडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही अनुसूचित जमातीचा दाखला द्यावा

"धनगड -धनगर" शब्दांचा खेळ करुन समाजावर अन्याय केला. अन्यायकारक अन् दुटप्पी भूमिका या पुढे सहन केली जाणार नाही. यापुढे आंदोलनाची सत्रे सुरुच राहतील. दोन महिन्यापूर्वी हरियाणा सरकारने तिथल्या धनगर समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील अनुसूचित जमातीचा दाखला द्यायला हवा.

गट तट पक्ष बघू नका

धनगर आरक्षणाप्रश्नी कोणीही आंदोलन पुकारले तरी त्या लढ्यात समाज बांधवानी गट-तट-पक्ष न पाहता सरकारला जागे आणण्यासाठी लढाईत सामील होऊन आरक्षणाचा वणवा पेटत ठेवा. संघटन दाखवून दुसऱ्या कोणावर टीका न करता एकीने आरक्षणाचा लढा सुरु ठेवा, असे आवाहन पडळकर यांनी बैठकीत समाज बांधवाना केले.

लोकांनी मला पाडले...पण मी...लढायचे सोडले नाही-

एकदा लोकसभा, 3 विधानसभा, 1 जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. सगळ्या निवडणुकात लोकांनी मला पाडले. पण मी लढायचे सोडले नाही. लोकांच्या प्रेमाच्या जोरावरच माझी आजवरची राजकीय कारकीर्द चालत आली आहे, असेही पडळकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...