आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉक लागून मृत्यू:चुलत्याच्या पिकास पाणी देताना पुतण्याचा विजेच्या शाॅकने मृत्यू

मंगळवेढा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुलत्याच्या शेतातील घरासमोर असलेल्या बोअरची मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पेटीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहित सुनील वेळापुरे असे मयत तरुणांचे नाव आहे. ही घटना १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३:४५ च्या दरम्यान आंधळगाव शिवारात घडली आहे. खबर मयताचे वडील सुनील कोंडीबा वेळापुरे रा. आंधळगाव यांनी दिली आहे.

मयताचे वडील सुनील वेळापुरे यांनी सकाळी अकराला मुलगा मोहितला फोन केला परंतु त्याने घेतला नाही. घरासमोरील इलेक्ट्रिक खंबाच्या पेटीजवळ केबल वायरवर मोहित जमिनीवर मृतावस्थेत आढळला. मंगळवेढा पोलिसात याची नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...