आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीपात्र:अस्थी विसर्जनाला गेलेल्या पुतण्याचा बुडून मृत्यू

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुलत्याच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीपात्रात बुडून मृत्यू पावल्याची घटना सोमवारी सकाळी पाकणी येथील सीना नदीकाठावर घडली. किशोर डिगाजी व्हटकर (वय २७, रा. हुनमान नगर, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ३३ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह पाकणी बंधाऱ्या लगत नदीपात्रात आढळला.नागनाथ व्हटकर यांच्या अस्थी विसर्जनासाठी किशोर व्हटकर व कुटुंबीय हे पाकणी येथे सीना नदीकाठी आले होते. अस्थी विसर्जनानंतर किशोर व इतर दोघे स्नानासाठी पाण्यात उतरले. नदीपात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने किशोर व्हटकर हा पाण्यात वाहून गेला.

बातम्या आणखी आहेत...