आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत‎:नेट 21 फेब्रुवारीपासून सुरू‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे राष्ट्रीय‎ पात्रता परीक्षा (नेट) परीक्षेच्या‎ तारखा जाहीर करण्यात आल्या‎ आहेत. ती जून आणि डिसेंबर‎ महिन्यात घेतली जाते. डिसेंबर‎ २०२२ मध्ये होणारी परीक्षा आता २१‎ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत होणार‎ आहेत. या परीक्षेसाठी यूजीसीच्या‎ संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू‎ झाली असून १७ जानेवारीपर्यंत अर्ज‎ करता येईल.‎

वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये,‎ विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक,‎ ज्युनिअर रिसर्च फेलोशिप,‎ असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी‎ राष्ट्रीय स्तरावर आॅनलाइन पद्धतीने‎ पात्रता चाचणी परीक्षा घेतली जाते.‎ सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना‎ ११०० रुपये शुल्क भरावे लागेल.

नेट‎ परीक्षा वर्षातून दोन वेळा हिंदी व‎ इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली‎ जाते. १८० मिनिटांच्या परीक्षेत दोन‎ प्रश्नपत्रिका असतात. पहिल्या‎ प्रश्नपत्रिकेत ५० तर दुसऱ्या‎ प्रश्नपत्रिकेत १०० बहुपर्यायी प्रश्न‎ असतात. या परीक्षेत निगेटिव्ह‎ मार्किंग केले जात नाही. दरम्यान‎ २०२३ या वर्षातील पहिली परीक्षा १३‎ ते २२ जूनमध्ये हाेईल.‎

बातम्या आणखी आहेत...