आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या नव्या सीपींचा इशारा:पहिल्याच दिवशी गुन्हेगारांवर कारवाईचे संकेत; राजेंद्र माने यांनी पदभार स्वीकारला

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक नियोजन व सामान्य नागरिकांसाठी पोलिसिंग याच माझ्या जमेच्या बाजू असतील आणि त्यावरच माझा भर राहील, अशी माहिती नवे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

20 वे पोलिस आयुक्त म्हणून माने यांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमाराला पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडूकर, दीपाली धाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 2009 ते 2012 या कालावधीत मी परिमंडळ उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे सोलापूरची बऱ्यापैकी माहिती आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांना मदत मिळावी, यासाठी माझे प्राधान्य आहे. वाहतूक नियोजन हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत कसे नियोजन करता येईल याबाबत मी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

वशिलेबाजी चाललणार नाही

पुढे ते म्हणाले की, माझे काम सामान्यांसाठी राहणार आहे. कोणीही एखाद्या कामासाठी वशिला घेऊन आला किंवा कोणाची शिफारस घेऊन आला. त्यापेक्षा जे नागरिक मला थेट येऊन भेटतील. त्यांच्या समस्या मला सांगतील. त्यांच्या कामांना माझे प्राधान्य राहिल. वशीला घेऊन आलाय ठीक, सामान्य नागरिकांना कोण न्याय देणार हा प्रश्न आहे, म्हणून सामान्य नागरिकच माझा केंद्रबिंदू राहील. याशिवाय वेल्फेअर पोलिसांची विविध समस्या अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय ठेवून काम करू, असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. विशेषतः मोटारसायकल चोरीचे प्रश्न अलीकडे सर्वच शहरांत वाढलेत. नेमके या घटनांचा अभ्यास करून त्या कशा रोखता येतील यावर उपाय करू. पोलीस चौक्या बंद बाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...