आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचा यापूर्वीची मक्तेदार कंपनी पोचमपाडकडून काम काढून लक्ष्मी इंजिनिअरिंगला दिले. या निर्णयाच्या विरोधात पोचमपाड कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. यात लवाद नेमण्यात आला असून, त्यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. नव्याने दिलेल्या रकमेपेक्षा कमी किमतीत काम करण्याचा प्रस्ताव पोचमपाड कंपनी देऊ शकते. यामुळे नवा पेच निर्माण होऊ शकतो. पुन्हा एकदा मक्तेदार बदलण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात वकिलांशी चर्चा करून अभिप्राय घेऊन वकील सांगतील तसा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांनी दिली. स्मार्ट सिटी कंपनीची पुढील बैठक सहा जानेवारी रोजी होणार आहे. त्यात याची चर्चा होऊ शकते.
स्मार्ट सिटी डेव्हलमंेट कंपनी संचालक मंडळाची गुरुवारी बैठक पार पाडली. यावेळी कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता, सीईओ शीतल तेली- उगले, तज्ञ संचालक सर्वेश जोशी, प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोरम नसल्याने सभा तहकूब करून सहा जानेवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले. चेअरमन गुप्ता यांनी समांतर जलवाहिनीच्या कामाबाबत चर्चा केली.
पोचमपाड कंपनीबाबत चर्चा केली. काेरम नसल्याने निर्णय घेेता आला नाही. बैठकीनंतर चेअरमन गुप्ता यांनी इंदिरा गांधी स्टेडियम, इंद्रभुवन इमारतीची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटी कंपनीने क्रीडा, पुरातन इमारती, शहरातील वाहतूक नियोजन, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, धार्मिक स्थळांचा विकास असे सर्वप्रकारची कामे केल्याचे गुप्ता म्हणाले.
पाणी प्रश्नावर तडजोड नाही
शहरातील पाणी प्रश्न सोडवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. हे काम करताना कंपनी तडजोड करणार नाही. १७० एमएलडी क्षमतेची जलवाहिनी घालण्यात येईल. पोचमपाड कंपनी लवादाकडे गेले असून, त्यांच्या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. कंपनीत अनियमितता झाल्याचा संशय आहे, त्याची चौकशी करण्यात येईल. -असिम गुप्ता, चेअरमन
आयुक्त बदलले, मक्तेदार बदलले
दीपक तावरे : हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीस मक्ता देण्यात आला.
पी. शिवशंकर : पोचमपाडचा मक्ता रद्द करून लक्ष्मी इंजिनिअरिंगला दिला.
शीतल तेली : मक्त्याबाबत आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.
समांतर जलवाहिनीचा गोंधळ पुन्हा सुरू
११० एमएलडी क्षमतेच्या समांतर जलवाहिनीचे ४५० कोटींचा टेंडर यापूर्वी पोचमपाड कंपनीस दिला होता. वेळेवर काम केले नाही, दर वाढवून मागत काम बंद ठेवले. त्यामुळे मक्ता रद्द करून लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीस १७० एमएलडी क्षमतेचे काम ६३९ कोटीस दिले. याबाबत पोचमपाडने न्यायालयात धाव घेतली. लवाद नेमला. लवादासमोर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रस्ताव कंपनीपुढे असल्याचे चेअरमन गुप्ता म्हणाले. न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण काम थांबवू नये, वेळेत काम होणे अपेक्षित आहे, असे गुप्ता म्हणाले.
दुहेरी वाहिनीच्या कामास गती द्या : पालकमंत्री विखे
सोलापूर शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीपात्रामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागते. महापालिका पाणीपुरवठा याेजनेला थेट पाणी देण्यासाठी दुहेरी पाइपलाइनच्या कामास गती देण्यासाठी त्वरित निर्णय घ्या, असा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालवा नियाेजनाच्या पुण्यातील बैठकीत दिला आहे.
३० जून २०२३ पर्यंत ४ आवर्तने सोडण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. त्यावेळी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.