आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमांना हजेरी:उपमुख्यमंत्री दाैऱ्यात नवे आमदार राजेंद्र राऊत, आवताडे यांना बळ

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी महापूजेसाठी गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच ते मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. एकदिवसीय दौऱ्यात दोन्ही तालुक्यातील कार्यक्रमास ते हेलिकॉप्टरने जात आहेत. शुक्रवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांत दोन ठिकाणी शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने नव्या आमदारांना ताकद देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असणार आहे. मंत्रीमंडळ विस्तार असल्याने फडणवीस यांनी राजकीय संकेत देणार का, अशी चर्चा रंगली आहे.

मुंबईहून विशेष विमानाने गुरूवारी सायंकाळी ५ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. हेलिकॉप्टरने पंढरपूरला जातील. पंढरपूर येथे ६ वाजता कोर्टी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन करतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पंढरपूर विकास आराखडा बैठक घेणार आहेत. शुक्रवारी पहाटे २ वाजता विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा करतील. पहाटे ५ वाजता संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेचा शुभारंभ ते करणार आहेत. सकाळी ११ वाजता काव्यतीर्थ आचार्य वेदान्तवाचस्पति पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या मूर्तीचे अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी १२ वाजता नंदूर ता. मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता बार्शीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. दुपारी सव्वा दोन वाजता डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलला भेट देणार आहेत. अडीच वाजता सोयाबीन प्रक्रिया उद्योग उदघाटन सोहळ्यास उपस्थिती असणार आहे. दुपारी ३ वाजता गांधी पुतळा येथे जाहीर सभेस मार्गदर्शन करतील.

साेलापूरचाच पालकमंत्री देण्याचा विचार हाेणार का? : लवकरच मंत्रिमंडळ विस्तार हाेणार आहे. त्यात जिल्ह्यातील नवीन चेह-यालाच संधी मिळेल अशी चर्चा आहे. त्यात रणजितसिंह माेहिते-पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते ही नावे पुढे आहेत. या सरकारने वापरलेले धक्कातंत्र कायम राहीले तर आवताडे यांनाही लाॅटरी लागू शकते. त्यामुळे फडणवीस यांच्या दाैऱ्यातून राजकीय संकेत मिळतील का अशी चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...