आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • New Plantings Replace 55 Per Cent And 64 Per Cent Of The Trees Cut Down In Quadrangle; A Total Of 1 Lakh 13 Thousand 26 Trees Were Cut Down |marathi News

नियम-अटी कागदावरच:चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवी लागवड कुठे 55 तर कुठे 64 टक्केच; एकूण 1 लाख 13 हजार 26 झाडे तोडली

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​जिल्ह्यात सहा महामार्गांचा विकास करताना १ लाख १३ हजार २६ झाडे तोडली. त्याच्या बदल्यात तोडलेल्या एका झाडामागे पाच झाडे लावण्याचे लक्ष्य दिले गेले होते. मात्र बहुतांश मार्गांवर झाडे लावण्याचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. विजापूर महामार्गावर ६४ टक्के तर हैदराबाद महामार्गावर ५५ टक्केच नवी झाडे लावली आहेत. आनंदाची बाब म्हणजे येडशी महामार्गावर लक्ष्यापेक्षा जास्त म्हणजेच ११० टक्के झाडे लावली आहेत.

सोलापूर परिसरात एकूण सहा महामार्गाचे काम करण्यात आले आहे. या पूर्ण महामार्गाची लांबी पाहता ६०२ किलोमीटर झालेली आहे. या मार्गाचे काम करत असताना रस्ता रुंदीकरणामुळे झाडे कापण्यात आली. एकूण झाडांचे लक्ष्य ५ लाख ६५ हजार १३१ होते. त्यानुसार पाहिले तर एकूण १ लाख १३ हजार २६ झाडे कापण्यात आल्याचे स्पष्ट होते.

सोलापूरच्या चारी बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. प्रथम सोलापूर- पुणे (मक्तेदार - आय एल अँड एफ एस), सोलापूर- हैदराबाद (श्रेई), सोलापूर - येडशी (आयआरबी), सोलापूर -विजापूर (आयजीएम), सोलापूर- सांगली, सोलापूर-अक्कलकोट महामार्गांचे चौदरीकरण करण्यात आले. झाडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मक्तेदाराकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिरणाकडून दर महिन्याला सर्व झाडांची पाहणी करत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तशी यंत्रणा त्यांच्याकडे नाही.

दोन ठिकाणी अपवाद, १०० % पेक्षा जास्त
मंगळवेढा मार्गावरील बोरगाव ते वाटंबरे या ५२ किमी रस्त्यावर ५२ हजार २३ झाडांचे लक्ष्य होते. सध्या इथे ५४ हजार १५२ झाडे आहेत. हे प्रमाण १०५.०९ टक्के आहे. तसेच वाटंबरे ते मंगळवेढा या ४५.६ किमी रस्त्यावर ३६ हजार ९६४ झाडांचे लक्ष्य होते. सध्या इथे ३९ हजार ८६७ झाडे आहेत. हे १०७.८५ टक्के आहे.

पुणे महामार्गावर तेवढी झाडे दिसत नाहीत...
पुणे महामार्गाच्या ११० किमीवर ९३,०३४ झाडे लावण्यात आली आहे. त्यानुसार एक किमीवर ८४५ झाडे झाली. एक किलोमीटरच्या हिशेबाने एक ते सव्वा मीटरच्या अंतरावर एक झाड असणे गरजेचे आहे. परंतु असे चित्र कुठल्याच राष्ट्रीय महामार्गावर पाहायला
मिळत नाही.

मी रजेवर; याविषयी बोलू शकत नाही
मी सध्या रजेवर असल्यामुळे याबद्दल बोलू शकत नाही.”
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

बातम्या आणखी आहेत...