आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी निगडित असलेल्या अनुभवांना आशयाची जाेड देत यंदा इयत्ता पहिलीसाठी नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. विचारांसह कल्पकतेला वाव देत चित्रे आणि रंगांचा समावेश असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक (मराठी सृजन बालभारती) शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार आहे. या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने दप्तराचे आेझेही कमी होणार आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात हे पाठ्यपुस्तक राज्यातील ६६ तालुक्यांमधील शाळांना प्रायोगिक तत्त्वावर दिले. त्यानंतर राज्य सरकारच्या ५ मार्च २०२१ च्या निर्णयानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला. आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये या पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी या पाठ्यपुस्तकाने शैक्षणिक जीवनाचा ‘श्रीगणेशा’ करतील.
सृजन बदल एकात्मिक व द्विभाषिक स्वरूपात मिळणार शिक्षण, विचारांसह कल्पकतेला वाव दप्तराचे आेझे कमी करण्यावर बालभारतीचा भर या पाठ्यपुस्तकाचे चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. हे भाग मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, वाहतूक व आपले मदतनीस या विशिष्ट विषयांशी संबंधित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजूबाजच्या परिसरातून पाठ्यपुस्तकातील आशय स्पष्ट होणार आहे. कृती, खेळ, कोडी, चित्रकला, गाेष्टी आणि गाणी यांचा उपयोग करून अध्ययन-अध्यापन आनंददायी होण्यासाठीचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. बालकांमध्ये वय वर्षे आठपर्यंत एकाचवेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते. याचा विचार करून पाठ्यपुस्तक गरजेनुसार द्विभाषिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
इमाेजीच्या माध्यमातून शिक्षणावर भर
भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू, करू, शिकू याचा विचार करून एकात्मिक स्वरूपात पहिलीच्या वर्गासाठी हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात अनेक प्रतीकांचा (इमाेजी) उपयोग करण्यात आलेला आहे. ते पाहूनच विद्यार्थ्यांना कोणती कृती करावयाची आहे याचा बाेध होऊ शकताे. थिंकर्स की आणि सहा थिंकिंग हॅट्सचा वापर पुस्तकात करणयात आला आहे. त्यामुळे पहिलीपासून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विकसित होण्यास मदत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण पद्धती
^अन्य बोर्डांच्या अभ्यासक्रम पद्धतीचा (पॅटर्न) अभ्यास करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीसाठी नवे पुस्तक असेल. यासाठी राज्यातील आदर्श शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्पात उपलब्ध करण्यात आले आहे.
- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.