आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा‎:न्यू तेलंगी पाच्छा पेठेत‎ येऊ लागले शुद्ध पाणी‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू तेलंगी पाच्छा पेठ येथील खड्डा‎ परिसरात दाेन ते अडीच महिन्यांपासून‎ गटारीचा वास असलेल्या पाण्याचा‎ पुरवठा केला जात होता. याबाबत‎ ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर‎ दोनच दिवसांत या वाहिनीची दुरुस्ती‎ झाली आहे. आता स्वच्छ पाणीपुरवठा‎ होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.‎ गेल्या दोन महिन्यांपासून गढूळ‎ पाणी येत होते. पाण्याला वास येत‎ होता. पाण्याच्या दिवशी सुरुवातीला‎ २५ ते ३० मिनिटे पाणी सोडून द्यावे‎ लागत होते. मग पाणी भरावे लागत‎ होते. पाणी उकळून थंड करून‎ पिल्यानंतरही अनेक मुलांची प्रकृती‎ बिघडली होती. याबाबत या‎ परिसरातील नागरिकांनी महापालिका‎ आणि झोनकडे वारंवार हेलपाटे‎ मारले. कोणीही दखल घेतली नाही.‎ ‘दिव्य मराठी’ने याबाबत बातमी‎ प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनात‎ हालचाल झाली आणि दुरुस्ती‎ करण्यात आली, असे नागरिकांनी‎ सांगितले.‎