आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या गुंतवणुकीतून उभे राहणाऱ्या यंत्रमाग घटकांनाच ‘टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड’ (टफ्) योजनेचा लाभ देण्याच्या धोरणात पारंपरिक यंत्रमागांचे काय होणार? असा प्रश्न कारखानदारांपुढे उपस्थित झाला आहे. पारंपरिक यंत्रमागांचे आधुनिकीकरण डोळ्यासमोर ठेवूनच या योजनेला प्रारंभ झाला. परंतु, नंतरच्या काळात केंद्र सरकारने नवनव्या अटी टाकून त्याचा लाभ दुरापास्त केला, अशा भावनाही कारखानदारांनी बोलून दाखवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी झालेली तरतूद ही प्रलंबित प्रकरणांसाठी आहे. लाभासाठी दाखल प्रस्तावांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने झाली.
सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला त्याचा फारसा लाभ झालेला नाही. त्यातील जाचक अटी दूर करून जुन्या आणि नव्या उद्याेगांची सांगड घातली तरच वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाला चालना मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा आधीच आर्थिक संकटात असलेल्या या उद्योगात नव्याने गुंतवणूक येईल कशी, असा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याचा विचार करावा, अशी मागणी सोलापूर यंत्रमागधारक संघाने केली आहे. लॉकडाऊननंतर यंत्रमाग कारखानदार अद्यापही पूर्वपदावर अालेला नाही. अशा घटकांच्या उत्पादनवाढीचा वेग वाढवण्यासाठी टफ् योजना नवसंजीवनी ठरली असती. परंतु नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांनाच त्याचा लाभ असल्याने छोट्या कारखानदारांची निराशाच झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.