आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामाजिक संदेश:वृत्तपत्र विक्रेता वाचकांना पटवून देतोय मास्क व सॅनिटायझर वापराचे महत्व, मास्क हीच खरी लस असल्याचे करतोय आवाहन

पापरी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्मेद शहा

सध्या कोरोना महामारीत मास्क अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. कोरोना होऊ नये आणि पसरू नये यासाठी मास्क घालणे सर्वांसाठीच गरजेचे आहे. हीच गोष्टी पाटकुल (ता. मोहोळ) येथील वृत्तपत्र विक्रेते गजानन बाचल 'सध्या मास्क हीच खरी लस' असल्याचे सांगत आपल्या वाचकांना मास्क घालण्याचे महत्व पटवून देत आहेत.

पाटकुल येथील ४८ वर्षीय गजानन दामोदर बाचल हे सन १९९७ पासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात,पाटकुलसह पेनुर येथे येवून ते वृत्तपत्र विक्री करतात, पापरी,खंडाळी,येवती, कोन्हेरी आदि परिसरातील वाचक त्यांच्या कडून वृत्तपत्रे घेवून जातात. बाचल यांच्याकडे विविध प्रेसच्या एक हजार वृत्त पत्रांची दररोज विक्री होत असते, मात्र मार्च महिन्यापासून त्यात तीनशे अंकाने घट झाली आहे.कोरोना महामारीचा फटका त्यांनाही बसला आहे.

वृत्तपत्राचे खरे शिल्पकार वृत्तपत्र विक्रेते असतात, कोरोना काळातही गजानन बाचल यांनी आपला हा व्यवसाय योग्य ती खबरदारी घेत सुरु ठेवलाय, दररोज पहाटे ४ वाजल्या पासून त्यांचा दिन क्रम सुरु होतो,विविध अंकात पुरवण्या घालने, गावो गावचे गठ्ठे बांधणे इत्यादी कामासाठी त्यांची पत्नी मुले मदत करतात.गेल्या २३ वर्षापासून वृत्तपत्र विक्रीतून ते वाचकांना सेवा देत आहेत, कोरोना काळात त्यांच्या गाव परिसरात रुग्ण आढळून आले असता त्यांच्या घरातील सदस्य बाचल यांना सदर व्यवसाय कांही काळ बंद ठेवण्याचा सल्ला देत होते, मात्र मागील २३ वर्षाच्या सेवेत खंड पडू द्यायचा नाही, या कठिन काळात तर वाचकांना अचूक माहिती व ज्ञान मिळने गरजेचे आहे, ग्रामस्थांना दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांपेक्षा वृत्तपत्रावर अधिक विश्वास आहे,त्यामुळे बंद न ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला व अखंडपणे त्यांचे कार्य सुरु आहे.

लॉकडाउन काळात कांही नवीन वयोवृद्ध वाचकवर्ग जोडला गेला असल्याचेही ते सांगतात.पेनुर येथे बसस्थानक परिसरात ते वृत्तपत्र विक्री करताना स्वतः मास्क घालतात, सॅनिटायझरचा वापर करतात,आलेल्या वाचक ग्राहकांनाही ते मास्कचा वापर करावयास सांगतात,स्वतः च्या जवळचे सॅनिटायझर त्यांना देवून त्याचा वापर करावयाचे सांगतात. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने 'मास्क हीच लस' असल्याचे ते वाचकांना सांगत आहेत.

ऑनलाइन आवृत्तीमुळे वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक फटका-सध्या सर्वच वाचकांच्या हातात स्मार्ट फोन आलेत, वृतपत्रांच्या ऑनलाइन आवृत्त्या सर्वांना ऑनलाइन पाहता येत आहेत,या ऑनलाइन अंकातील बातमी सोशल माध्यमात अंक स्टॉल वर विक्रीस येण्या अगोदर वेगाने फॉरवर्ड होतात त्यामुळे अंक विक्री कमी झाली आहे,वृत पत्रांनी ऑनलाइन आवृती सकाळी लवकर न प्रसिद्ध करता जरा उशिरा करावी अशी प्रतिक्रियाही बाचल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...