आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास केंद्र:विद्यार्थ्यांनी राजकीय व सामाजिक घडामोडींच्या माहितीसाठी वृत्तपत्रे; नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या नावाने अंत्रोळीत अभ्यास केंद्र

दक्षिण सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राजकीय व सामाजिक घडामोडींच्या माहितीसाठी वृत्तपत्रे वाचावीत. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळेल, असे जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार यांनी सांगितले. अंत्रोळी येथे साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने कै. नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या नावाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर होते.

प्रारंभी देशभक्त डॉ. कृ.भि. अंत्रोळीकर, कै. नानासाहेब अंत्रोळीकर व कै. वसंतराव आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच कोमल करपे, प्रा. महेश माने, भीमराव परीक्षाळे, शरद नागणे, मजनोद्दीन पठाण, प्रकाश थोरात, तुकाराम जाधव अजयसिंह पवार म्हणाले, अंत्रोळीच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करावा. त्यासाठी मी मदत व मार्गदर्शन करण्यास तयार आहे. ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, तुम्हाला निश्चितच यश मिळेल. यावेळी आनंदकुमार अंत्रोळीकर, शरद नागणे, सरपंच करपे, पठाण व जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक भीमराव परीक्षाळे यांनी केले.

केंद्रासाठी आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी घरातील दोन खोल्या मोफत अभ्यास करण्यास दिल्या आहेत. यावेळी शरद नागणे, रवी बंडे, दावल शेख व श्री. जोशी यांनी या अभ्यास केंद्रासाठी पुस्तके व इतर साहित्यासाठी मदत जाहीर केली. सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन म्हाळाप्पा वडरे सर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...