आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाढा-वैराग, मालवंडी-नरखेड तसेच कुर्डुवाडी परंडा या तीन मार्गांवरील रस्ते डांबरीकरणासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली. या तिन्ही रस्ते कामांसाठी नऊ कोटी ६८ लाख ६३ हजार इतका निधी मंजूर होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. माढा नगरपंचायत कार्यालयापासून १७०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३ कोटी ६१ लाख ४९ हजार निधी आला आहे. मालंवडी ते कापसेवाडी आणि मानेगाव ते नरखेड रस्ता या पाच किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी २६ लाख मंजूर झाले. बार्शी नाका ते करमाळा चौक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ८१ लाख १४ हजार निधी मंजूर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.