आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक चौक पोलिस चौकीसमोर मुख्य चौकातच भला मोठा खड्डा पडला आहे. आठ ते दहा वर्षांपासून ही समस्या कायम आहे. सहा शाळा अणि तीन महाविद्यालयांचे सुमारे १० हजार विद्यार्थी या मार्गाने दररोज ये -जा करतात. ग्रामीण, शहर पोलिस मुख्यालय शेजारी असल्यामुळे पोलिस ये- जा करतात. वाहतुकीची रेलचेल असताना या रस्त्यावरील खड्डे अनेकांच्या मनात धडकी भरवतात. जुना बोरामणी नाका ते गुरू नानक चौक हा रस्ता कधी संपतो ? असे प्रत्येकाच्या मनात येते.
पालिका ठोस उपाययोजना करत नाही. अशोक चौकात तात्पुरती दुरुस्ती केली जाते शनिवारी या ठिकाणी माहिती घेताना नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या. काहीही करा हा रस्ता काही दुरुस्त होत नाही, असेच ते सांगत होते.अशोक चौक ते गुरू नानक चाैक रस्त्याच्या कामाचे टेंडर पालिकेकडून निघाले आहे.
नगरअभियंता यांना भेटून माहिती दिली
अशोक चौकातील खड्ड्याबाबत महापालिका नगर अभियंता यांना भेटू माहिती दिली आहे. पत्रव्यवहार केला आहे. जुना बोरामणी नाका ते गुरू नानक चौक हा रस्ता पावसाळ्यानंतर दुरुस्त करतो म्हणालेत. पण, तोपर्यंत या रस्त्याची काय अवस्था होईल. आम्ही अनेकदा स्वतःहून मुरूम टाकून खड्डे बुजवलेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.'' धनाजी शिंगाडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक.
या मार्गावरील शाळा काॅलेज
या मार्गावर दयानंद, लालचंद तसेच पॉवरमेंट पाॅलिटेक्निकसह कुचन, बुर्ला, आंध्रभद्रावती, लाेकसेवा, बाेमड्याल तसेच पुल्ली कन्या प्रशाला आदी शाळा-महाविद्यालये आहेत.
सिमेंट रस्ता झाला पाहिजे
अशोक चौकात कायमस्वरूपी दुरुस्ती का होत नाही? मुरूम, माती खडी टाकल्यावर पुन्हा तो रस्ता उखडतो. याठिकाणी सिमेंट रस्ता झाला पाहिजे. ''
सी. टी. व्हटकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.