आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांना विमानसेवा नाही तर व्हीआयपीना पण नाही:दिवाळीपर्यंत प्रवासीसेवा सुरू करा, अन्यथा; उपाेषणाचा इशारा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून दिवाळीपर्यंत प्रवासीसेवा सुरू झाली तर चक्री उपाेषण करण्याचा निर्धार शनिवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती बैठकीचे निमंत्रण तथा सोलापुर विकास मंचचे केतन शहा यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या सुजाण साेलापूरकरांच्या बैठकीत माजी आमदार नरसिंग मेंगजी आणि माजी उपमहापाैर राजेश काळे हेही सहभागी हाेऊन संतप्त साेलापूरकरांच्या भावनेशी सहमत असल्याचे सांगितले. पहिल्या दिवसाचे उपाेषणकर्ते आम्हीच असेही त्यांनी नमूद केले.

सनदशीर मार्ग वापरु

सोलापूर विकास मंचच्या वतीने झालेल्या बैठकीत उद्याेजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित हाेते. विमानसेवेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. न्यायालयीन निवाडे झाले तरी प्रशासन हलायला तयार नाही. त्याच त्या मुद्द्यांवर कागदी घाेडे नाचवले जात आहेत. प्रशासन साेलापूरकरांच्या संयमाचा अंत पाहत आहे. परंतु विकास मंचने सनदशीर मार्ग साेडलेला नाही. लाेकशाही मार्गानेच हा प्रश्न तडीस नेण्याच्या दृष्टीने आता व्यापक जन आंदाेलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

यांची उपस्थिती

यावेळी केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, विजय जाधव, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रतीक खंडागळे, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, कैलास लांडगे, सुहास भोसले, जयश्री तासगावकर, गौरी आमडेकर, अनिता कुलकर्णी, डॉ. सुभाष वैकुंठे, डॉ. दिलीप बुरटे, अरविंद रंगा, बालकृष्ण अवधूत, भक्ती जाधव आदी उपस्थित हाेते.

व्हीआयपींना नाही

सामान्य साेलापूरकरांना विमानसेवा मिळत नाही. परंतु व्हीआयपी मंडळी माेठ्या दिमाखाने विमानाने येतात. सामान्यांच्या विमान प्रवासी सेवेवर त्यांचे माैन असते. जिथे सामान्यांना सेवा नाही, तिथे व्हीआयपींचे कशाला? असा प्रश्न उपस्थित करून या बैठकीत प्रतिकात्मक कुलूप दाखवण्यात आले. हाेटगी रस्त्यावरील विमानतळाला कुलूप ठाेकून व्हीआयपींसाठीही सेवा बंद करा, अशा घाेषणा या वेळी देण्यात आल्या.

विरोधात मोहीम

होटगी रस्त्यावरील विमानसेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे सोलापुर विकास मंचने त्याच्या विरोधात मोहीम उघडली. परंतु प्रशासन हलत नसल्याने पुढे काही होत नाही. याबद्दल या बैठकीत तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...