आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:फेरीवाल्यांना कर्ज देताना सिबिल तपासणी नको

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात छोटे व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने स्वनिधी योजनेतंर्गत फेरीवाल्यांना दहा हजार रुपये कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. कर्ज देताना कर्जदारांची ऐपत तपासण्यात येत असून, ती तपासू नये, असा आदेश शासनाने दिला आह,े अशी माहिती महापालिका नागरी समुदाय योजनाचे प्रमुख समीर मुलाणी यांनी दिली.

मात्र कर्ज देताना बँकामार्फत सीबिल तपासणी करण्यात येत असल्याने अडचणी येत आहेत. सोलापुरात ११ हजार फेरीवाले, पथविक्रेते, छोटे व्यवसायिक असून, यापैकी ६ हजार ५०० जणांना कर्ज पुरवठा करण्यात आले. अन्य ४ हजार ५०० जणांचे प्रकरण थांबले असून, त्यांना कर्ज मिळावे म्हणून महापालिका यूसीडी विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याची मुलाणी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...