आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:पूर्वीच्या दाखल गुन्ह्यात अधिकाऱ्यांची हजेरी नाही

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू गळित हंगामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता गाळप हंगाम सुरू केला. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सिद्धेश्वर कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली हाेती. परंतु अधिकाऱ्यांनी अद्यापही गुन्हा नाेंदवला नाही. पर्यावरण अनुकूलता नसल्याने २०२० मध्ये थेट न्यायालयात फाैजदारी तक्रार दाखल केली हाेती. त्यावर सहा वेळा सुनावणी झाली. एकाही सुनावणीला मंडळाचे अधिकारी हजर नव्हते.

पालकमंत्री विखे यांचा दाैरा नुकताच झाला. हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरीसेवा देण्याची मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अजित पाटील उपस्थित हाेते. त्यांनीच कारखान्याने बेकायदेशीर गाळप सुरू केल्याचा मुद्दा मांडला. त्यावर पालकमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्याबाबत अधिकाऱ्यांनी अद्यापही कुठलीच कारवाई केलेली नाही.

हरित लवादासमाेरही पाटील अनुपस्थितच
राष्ट्रीय हरित लवादासमाेर सुरू असलेल्या तारखांनाही अजित पाटील गैरहजर हाेते. त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांना लवादासमाेर जावे लागले होते. याबाबत वारंवार कळवूनही पाटील यांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले. शिवाय इतर नागरिकांच्या तक्रारींचेही निरसन कार्यालय प्रमुखांकडून झालेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयांकडून पाटील यांच्या कार्यशैलीबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...