आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळमध्ये श्री नागनाथ यात्रा:ना चिंता ना भय...नागनाथ महाराज की जय; दिल्ली दरवाजात भाकणूक ऐकण्यासाठी नागेश भक्तांनी केली उन्हातही गर्दी

मोहोळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राजकारणात सर्वांशी विचारमंथन करून, आलेल्या संकटांवर मात करीत सत्ताधाऱ्यांना यश प्राप्तीचा मार्ग मिळेल. सर्वत्र शांतता नांदेल, अशी भाकणूक श्री क्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रेनिमित्त गणासह निघालेल्या मिरवणुकीत श्री नागनाथांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी मुख्य दिल्ली दरवाजात वर्तवली.

साक्षात शंकर जाणुनिया संत लागती पायी | लीला विग्रही अवतरला तो येथे संशय नाही|| ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्व ही जातो| आठविले ते एक्या भावे उद्धवचिद्धन गातो||

यात्रेचे प्रमुख आर्कषण असणाऱ्या गणाची पालखीसह मिरवणूक ७ मे रोजी दुपारी चार वाजता सवाद्य निघाली. त्यापूर्वी श्री नागनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्यात वायुरूपाने संचार होऊन पालखीसह साकी व अभंगाच्या माध्यमातून ‘ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय’चा भाविकानी जयघोष करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला. हजारो नागेश भक्तांनी खर्ग तीर्थावर नागनाथाचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज व हेग्रसांचे वंशज अरुणबुवा मोहोळकर यांचा गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो कडक उन्हात मोठी गर्दी केली होती. प्रारंभी दिल्ली दरवाजात देशाच्या राजकारणाची भाकणूक झाली.

खर्ग डोहासह, काकडे पार, मुंगीचा धोडा येथे सांगण्यात आलेल्या भाकणुकीत यंदा पाऊस समाधानकारक असून, चारा मुबलक होईल, असे सांगत रोगराई काही काळ होणार असल्याची भाकणूक खर्गे महाराजांनी केली. पालखीसह निघालेली मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष व पंचकमिटीच्या सदस्यासह नागेश भक्तांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यात्रेत मनोरंजनासाठी लहान-मोठे पाळणे, अनेक लहान-मोठ्या खेळण्यांची, सौंदर्यप्रसाधनाची, मिठाईची दुकाने उभारल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे. श्री नागनाथ महाराजांची पालखी मिरवणूक व पुण्य भक्त भिकलिंगप्पा यांच्या गुरू-शिष्य भेटीदरम्यान ६ रोजी नागनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने केलेली नयनरम्य शोभेच्या दारूकामाची, फटाक्यांची आताषबाजी हजारो भाविकांना पाहण्यास मिळाली.

यात्रेत या सामाजिक संस्थांनी केली पाण्याची सोय
हरिओम मित्र मंडळ, इलियास भाई शेख मित्र परिवार, संतोष गायकवाड मित्र परिवार, मक्का मजिद, स्व. सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या स्मरणार्थ शिवसेनेच्या वतीने, लोकराज्य युवा मंडळ, शिक्षण मित्र डी. व्ही. गायकवाड यांच्या स्मरणार्थ, युवा सेनेच्या वतीने सचिन जाधव, बागवान जमियात, अमित कुलकर्णी, अविनाश गोडसे, बागवान जमियात यासह अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शरबत, मट्टा व थंड पाण्याची सोय जागोजागी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...