आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाचा नवा भोंगा:पाणी टंचाई अन् दहापट कर वाढीची नोटीस; देशमुखांनी विचारला मनपा आयुक्तांना जाब

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचा महापालिकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा, 21 दिवसांची हरकतीसाठी मुदत

उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामाेरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे. अशा वातावरणातच महापालिकेने गावठाण भागातील दीड लाख मिळकतदारांना भांडवली मूल्यात ४० टक्क्यांपेक्षा अधिकच्या मालमत्ता कर आकारणीची (१० हजारांवरून १ लाख) नोटीस बजावल्यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्षाचा नवा भोंगा शुक्रवारी वाजला. माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची भूमिका जाहीर केली तर भाजपचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालिकेत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

पाणी टंचाई व मिळकत कर प्रकरणी आमदार देशमुख यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. तत्पूर्वी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी वाढीव मिळकतीवरून पत्रपरिषद घेतली. शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक आम्हाला फोन करीत आहेत. आम्ही नागरिकांना काय उत्तर द्यायचे. वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही वीज मंडळाच्या कार्यालयासमोर जाऊन बसतो. मिळकतदारांना न पेलणाऱ्या वाढीव कराच्या नोटिसा कशा दिल्या. सात हजार बिल भरणाऱ्यांना १.१७ लाखाचा मालमत्ता कर कसा मागता, असा सवाल आमदार देशमुख यांनी केला. प्रशासन काळात केवळ तडजोडीसाठी हा प्रकार महापालिकेत सुरु असल्याचा घणाघाती आरोप भाजपा शहरध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केला. पाणीपुरवठ्याबाबत झोन अधिकारी आणि पालिका पाणीपुरवठा विभाग यांच्यात समन्वय नाही. वीज मंडळासोबत बैठक घेऊन नियोजन करू, असे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीशिष्टमंडळाला सांगितले.

रुद्रेश बोरामणी यांना ७ हजारावरुन १.१७ लाखाची कर नोटीस : भाजपाचे शहर सरचिटणीस रुद्रेश बोरामणी यांचे १९७२ साली बांधलेल्या घरात वाढीव बांधकाम नाही. दरवर्षी पाच टक्के सुट घेऊन कर भरतात. वापर परवाना आहे. पूर्वी ६ ते ७ हजार कर येत होता. आता १.१७ लाखाची नोटीस आलभ. नोटीस मान्य नसून बोरामणी यांनी पालिकेकडे हरकत नोंदवली आहे.

बातम्या आणखी आहेत...